सांगली : विट्यात घरात घुसून चौघांना मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : विट्यात घरात घुसून चौघांना मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

विटा, पुढारी वृत्तसेवा : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून एकाचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला तसेच अन्य तिघांना जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.१६) रात्री विट्यातील आंबेडकर नगर येथे घडला. यात सुशांत भोजराज गायकवाड गंभीर जखमी झाला असून उमेश भिवाजी भंडारे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बाळू कांबळे उर्फ बिल्ला, महेश मिसे, रोहित भिंगारदेवे, मनोज रीते, ज्ञानेश्वर अवघडे, सचिन गुजरातकर (सर्व रा.फुलेनगर, विटा) या सहा जणांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, येथील आंबेडकर नगरातील वकील उमेश भंडारे यांच्या घरात सर्वजण जेवत असताना आंबेडकर नगरातील बाळू कांबळे हा तिथे आला आणि सुशांत गायकवाड तिथे आला आहे का? असे विचारू लागला. सुशांतला बाहेर पाठवा दुपारी त्याने मला शिवीगाळ केली आहे. सुशांतला जिवंत ठेवणार नाही. काही वेळाने महेश मिसे, मनोज रीते, ज्ञानेश्वर अवघडे आणि सचिन गुजरातकरहे हे चौघे आले. त्यानंतर आरोपींनी सुशांत गायकवाड आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button