सांगली : राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील २१ विद्यार्थी | पुढारी

सांगली : राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील २१ विद्यार्थी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्त्ती परीक्षेत जिल्ह्यातील 21 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले. तसेच जिल्ह्यातील 859 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीचा निकाल 28.15 टक्के आणि आठवीचा निकाल 16.97 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीच अग्रेसर असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

अग्रजा, शाहीद राज्यात सहावी

अग्रजा गणेश गुरव (95.97 टक्के, जि. प. शाळा, आरग), शाहीद शब्बीर तांबोळी (95.97 , जि. प. दहिवडी) या दोन विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक आला आहे.

इयत्ता पाचवीतील ग्रामीण विभागील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी नावे अशी ः श्रावणी सचिन सपकाळ (95.30, सगरे विद्यालय हिंगणगाव), अमय अनिल जाधव (94.63 जि. प. शाळा, खुजगाव), सुजल श्रीकांत कणसे (94.63, जि. प. शाळा, लक्ष्मीवाडी), विश्वभारती विनायक पाटील (94.63, जि. प. पांढरेवाडी), अभिजित भगवान जावडे (94.63, सरस्वती विद्यामंदिर, सांगली), साईराज तानाजी कोडक (95. 97, जि. प. ढालेवाडी) तसेच सीबीएससीमधील प्रार्थना शितल चव्हाण, अंकली.

इयत्ता पाचवी शहरी विभागील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे ः केतकी सुधीर चौगुले (94.63 टक्के , आर. एन. गर्ल्स हायस्कूल, सांगली), अनन्या अमित कोरे (93.95, विटा हायस्कूल), मेघना विक्रम शेळके (93.95, इस्लामपूर हायस्कूूल अ‍ॅन्ड ज्यू कॉलेज ऑफ सायन्स इस्लामपूर)

निर्झरा, सार्थक राज्यात सहावी

निर्झरा अनिल गायकवाड (89.93 टक्के, संजय घोडावत स्कूल, अंकली), सार्थक महेश पाटील (89.93, संजय घोडावत स्कूल, अंकली) या दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमाक पटकविला आहे.

इयत्ता आठवी ग्रामीण विभाग ःआदित्य विजय खिलारी (88.59, श्रीराम हायस्कूल, करगणी), श्रेणिक प्रताप शिंदे (88.59, लोकनेते डी. पाटील, कुमठे), अथर्व विजय खिलारी (87.91, श्रीराम हायस्कूल करगणी), अनिकेत शामराव शिंदे (87.91, न्यू इंग्लिश स्कूल घरनिकी), स्वरा श्रीकांत अहंकारी (85.90, संजय घोडावत, अंकली),
शहरी विभाग ः पारस कुबेर पाटील (89.93, इस्लामपूर हायस्कूल अ‍ॅन्ड ज्यू कॉलेज ऑफ सायन्स, इस्लामपूर) तसेच सीबीएससीमधील सांगलीतील अस्मिता विनोद दशमी)

इयत्ता पाचवीतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले 10 विद्यार्थी ः अग्रजा गणेश गुरव, शाहीद शब्बीर तांबोळी, श्रावणी सचिन सपकाळ, अमय अनिल जाधव, सुजल श्रीकांत कणसे, विश्वभारती विनायक पाटील, अभिजित भगवान जावडे, पार्थ चंद्रकांत पाटील, चिन्मय नामदेव गुरव.

इयत्ता आठवीतील जिल्हा गुणवत्ता यादीतील पहिले 10 विद्यार्थी असे ः निर्झरा अनिल गायकवाड, सार्थक महेश पाटील, आदित्य विजय खिलारी, श्रेणिक प्रताप शिंदे, अर्थव विजय खिलारी, अनिकेत शामराव शिंदे, स्वरा श्रीकांत अहंकरी, मधुरा प्रताप पाटील, आयुष्णी विजय जाधव, वैभव दादासाहेब खांडेकर.

Back to top button