Landslide: चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या रस्त्यावर भूस्खलन, वाहतुकीस रस्ता खुला | पुढारी

Landslide: चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या रस्त्यावर भूस्खलन, वाहतुकीस रस्ता खुला

शिराळा; पुढारी वृत्तसेवा: शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन (Landslide) झाले आहे. मणदूर ते खुंदलापूर या डोंगर कपारीच्या मार्गावर डोंगराचा कडा अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. यानंतर हा रस्ता काही काळ वाहतूकीस बंद करण्यात आला होता. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या रस्त्यावर कोसळले मोठे दगड आणि माती प्रशासनाने त्वरित काढून पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हा मार्ग खुंदलापूर अभयारण्याकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. खुंदलापूर एकमेव गाव अभयारण्याला लागून आहे. या गावाचे पुर्नवसन करण्यासाठी वन खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. याच दरम्यान चांदोली अभयारण्य आणि परिसरातील डोगर माथ्यावरील काही भागाचे भूस्खलन (Landslide) झाले.

अतिवृष्टीमुळे चांदोली अभयारण्यातील रस्ते वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर तत्काळ हा रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. परंतु आज सकाळी प्रशासनाने तस्त्यावरील मोठे दगड आणि माती दूर केल्याने हा रस्ता वाहतुकीस खुला झाला.

याआधी चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या ऑक्टोंबर महिन्यात रस्ते दूरूस्तीचे काम वनखात्याकडून करण्यात येत आहे. यानंतर अभयारण्य पर्यटकांना खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्य पाहण्यासाठी गर्दी करतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button