सांगली : विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटी मंजूर; योगेश जानकर यांची माहिती | पुढारी

सांगली : विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटी मंजूर; योगेश जानकर यांची माहिती

जत : पुढारी वृत्तसेवा; जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याची भूमिका बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने घेतली असून गेल्या दीड महिन्यापासून विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी मंजुरी द्यावी, म्हणून पाठपुरावा सुरू होता. अखेर शुक्रवारी झालेल्या मुंबईतील बैठकीत पाणी योजनेसाठी दोन हजार कोटीचा निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला. याबाबतचा आदेश वीस डिसेंबरच्या कॅबिनेटमध्ये होणार आहे. या बाबतची माहिती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

तसेच जानकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन केले. यावेळी जानकर म्हणाले, तालुक्यातील 65 वंचित गावांना गेले एक दशकाहून पाणी प्रश्नवर निवडणुका जिंकल्या होत्या. परंतु गांभीर्याने याबाबत कोणताही महत्वाचा निर्णय घेतला नाही. दुष्काळग्रस्तांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत झालेले नाहीत. तालुक्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.

सीमावर्ती भागासह जत तालुक्यात शिक्षकांची पदे, रिक्त आहेत अनेक शाळांना भौतिक सुविधा अपुऱ्या आहेत परिणामी याचा परिणाम विद्यार्थ्यावर व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना यासंबंधी लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे सूचना दिले आहेत.

तसेच तालुक्यात रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी म्हणून यासाठी उदय सामंत यांना व शिक्षण मंत्री केसरकर यांना जत तालुक्याचा दौरा करून तेथील प्रश्न सोडवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात दोन्ही मंत्र्यांचा दौरा होणार आहे, पाणीपुरवठा योजनेसाठी 200 कोटींची तरतूद करावी अशी सूचना संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा;

Back to top button