सांगली : विटा पोलिसांनी संबंधितांना परत केला सात लाख रुपयांचा मुद्देमाल | पुढारी

सांगली : विटा पोलिसांनी संबंधितांना परत केला सात लाख रुपयांचा मुद्देमाल

विटा, पुढारी वृत्तसेवा : विटा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचा छडा लावून एकूण तीन लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला आहे.  ९४ ग्रॅम सोन्याचे आणि २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने संबंधितांना परत केल्याची माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक डोके म्हणाले, जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी अश्या मालमत्तेविरुध्द गुन्ह्यातील जप्त मुददेमाल संबंधीत फिर्यादिंना परत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही २०२१ मध्ये तालुक्यातील रेणावी येथे झालेल्या एका गुन्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे त्यामध्ये ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल फिर्यादी अनिता सुभाष गुजले यांना परत केला. तसेच याच गुन्ह्यातील ७५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने साक्षीदार उत्तम गुलाब गुजले यांना परत केले आहेत.

यावर्षी दाखल गुन्ह्यातील ६६ हजार रुपये किंमतीचे, २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने फिर्यादी किसाबाई भगवान जाधव (रा पोसेवाडी) यांना परत केला आहे. या दोन गुन्ह्यातील एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल असून यामध्ये एकूण ९४ ग्रॅम सोने आणि २५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. ही कार्यवाही पोलीस नाईक अभिजीत वाघमोडे यांनी केली आहे, असेही डोके यांनी सांगितले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button