सांगली : शिरगावात तरसांच्या हल्ल्यात कोल्ह्याचा मृत्यू

तासगाव :  शिरगाव (वि) (ता. तासगाव) येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन तरसांनी केलेल्या हल्ल्यात एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. तर दोन म्हशीसह दोन बैल आणि एक रेडकू जखमी झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने धाव घेऊन पंचनामा केला.

वनरक्षक रवींद्र कोळी यांनी तेथील पायांचे ठसे तरसाचे असल्याचे सांगितले. तसेच दोन तरस आणि कोल्हा यांच्यात झालेल्या झटापटीत कोल्ह्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली. शिरगाव येथे दीपक पाटील व दिनकर पाटील यांच्या या गोठ्याच्या बाजूस उसाची शेती आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन तरसांनी जनावरांवर हल्ला केला. हल्ल्यात दोन बैल आणि दोन म्हशी आणि एक रेडकू जखमी झाले.

Exit mobile version