मिरज : म्हैसाळ हत्याकांड; दोषारोपत्र दाखल | पुढारी

मिरज : म्हैसाळ हत्याकांड; दोषारोपत्र दाखल

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथे गुप्तधनाच्या हव्यासातून झालेल्या 9 जणांच्या हत्याकांड प्रकरणी मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा साथीदार धीरज सूरवशे, मांत्रिकला औषध पुरवठा करणारा मनोज क्षीरसागर आणि आर्थिक व्यवहार पाहणारी मांत्रिकाची बहीण जैतूनबी मोहम्मद अली बागवान या चौघांविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात बुधवारी दोषारोपत्र दाखल केले.

गुप्तधनाच्या हव्यासातून म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे आणि त्यांचे भाऊ शिक्षक पोपट वनमोरे या दोघांनी सावकारांकडून कर्ज घेऊन मांत्रिकाला पैसे दिले होते. परंतु वनमोरे कुटुंबाला गुप्तधन मिळाले नव्हते. गुप्तधन न मिळाल्याने वनमोरे कुटुंबाने मांत्रिक अब्बास बागवान याच्याकडे दिलेले पैसे परत मागितले होते. या तगाद्याला वैतागून मांत्रिक बागवान याने मनोज क्षीरसागर यांच्याकडून गलाई व्यवसायात वापरले जाणारे विषारी औषध घेऊन धीरज सूरवसे यांच्या मदतीने वनमोरे कुटुंबातील 9 जणांचे हत्याकांड केले होते.

Back to top button