सांगली : कानडवाडीत तरुणाला मारहाण करून लुटले | पुढारी

सांगली : कानडवाडीत तरुणाला मारहाण करून लुटले

कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथे राकेशकुमार श्रीप्रमोद राय (सध्या रा. कानडवाडी, मूळ गाव बिहार राज्य) या तरुणाला रिक्षातून आलेल्या चार तरुणांनी काठी, दगडाने बेदम मारहाण करून जखमी केले होते. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : जखमी राकेशकुमार हा तरुण मंगळवारी एका गोदामाजवळ मोबाईलवर बोलत थांबला होता. यावेळी संशयित अमीन मुलाणी, अविष्कार गाजे, ऋषिकेश सकटे, सय्यदअली मुलाणी या चारजणांनी रिक्षातून (एम.एच.10 के – 3914) येऊन राकेशकुमारला मारहाण केली. त्याच्या हातातील 7 हजारांचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी चौघांना अटक केली होती. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल पोलिसांनी सोमवारी जप्त केला.

Back to top button