सांगली : तुळजापूरहून ज्योत आणताना गाडीतून पडून तरुणाचा मृत्यू | पुढारी

सांगली : तुळजापूरहून ज्योत आणताना गाडीतून पडून तरुणाचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा: तुळजापूर येथून ज्योत घेऊन येत असताना गाडीतून तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. करणाप्पा दर्याप्पा ऐवळे (वय २२, उमदी, ता.जत) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.२६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथील हलसंगी फाट्यानजीक घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोणती येथील तरुण दरवर्षी तुळजापूर येथून आंबामातेची ज्योत आणत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सगळे तरुण ज्योत आणण्यासाठी गेले होते .यात करणाप्पा ऐवळे या तरूणाचा समावेश होता. परंतु ज्योत घेऊन परत उमदीकडे येत असताना कर्नाटकातील हालसंगी फाट्यानजीक गाडीतून करणाप्पा याचा तोल जाऊन तो चाकाखाली चिरडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button