सांगली : कापुसखेडचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

सांगली : कापुसखेडचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : खरेदीपत्राच्या नोंदीसाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना कापूसखेडचा तलाठी सुनील बाबुराव जावीर (रा. मिरजवाडी, ता. वाळवा) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. शुक्रवारी (दि. १६) दुपारी सांगलीच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदाराला लाचेची १५ हजार रुपयांची रोकड कारमध्ये ठेवायला सांगून सापळ्याचा सुगावा लागल्याने तलाठी सुनील याने पलायन केले होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत जावीर याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचलंत का?

 

Back to top button