
इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या 2022-23 साठी सभासद नोंदणी धुमधडाक्यात सुरू झाली आहे. वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांतील जास्तीत-जास्त महिलांनी आपली नाव नोंदणी केल्यानंतर बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंग थर्मास प्रत्येक महिलेस गिफ्ट मिळणार आहे. तसेच लाखो बंपर बक्षीस योजना तसेच मोफत कुपनच्या माध्यमातून अनेक बक्षिसांची खैरात महिलांसाठी उपलब्ध केली आहे. तरी महिलांनी आपली सभासद नोंदणी आजच 'फिक्स' करावी, असे आवाहन 'कस्तुरी क्लब'च्या आयोजकांनी केले आहे.
कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना घरातून बाहेर पडून आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. कस्तुरी क्लब हे महिलांसाठी एक व्यासपीठ बनले आहे. सेलिब्रीटींबरोबर कस्तुरी सभासद महिलांना आनंद घेता येत आहे. त्यामुळे दै. पुढारी कस्तुरी क्लब हे महिलांसाठी आकर्षण बनले आहे. विविध प्रकारचे प्रशिक्षण, कार्यशाळा, लावणी संगीत मैफिल, सिने कलाकारांसोबत गप्पा, पाककला स्पर्धा आदींचे आयोजन केले जाते. तसेच वेळोवेळी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ व बक्षिसांचा वर्षाव केला जातो.
तरी महिलांनी आजच सभासद व्हा आणि हातात घ्या बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंग थर्मास हमखास गिफ्ट. प्रत्येक महिलेला ओळखपत्र दिले जाणार असून सभासद नोंदणी 600 रुपये आहे. जास्तीत -जास्त महिलांनी सभासद व्हावे, असे आवाहन केले आहे. मग तर चला, सज्ज व्हा आता वर्षभर कार्यक्रमाच्या मेजवाणीसाठी. सभासद नोंदणीसाठी दै. पुढारी विभागीय कार्यालय, इस्लामपूर- मोबा.7972724391 वर संपर्क साधावा.
यावर्षी काढण्यात येणार्या भव्य लकी ड्रॉमध्ये वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने 1 वॉशिंग मशीन, युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांच्याकडून 4 फ्रीज, रुपाली खंडेराव जाधव यांच्याकडून 1 आटाचक्की, मे. राजमाने ब्रदर्स- 10 गिफ्ट हॅम्पर, 1500 रुपयांचे डबल बेडशीट, माऊली बझार-5 कम्बो कीट (घरगुती वस्तूंचे 1 हजार रुपयांचे 5 कीट), सिद्धी बॅग हाऊस-3 ट्रॅव्हल्स बॅग्ज व 4 लेडीज पर्स, देव टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स- 3 सभासदांना 2 दिवसाची मोफत ट्रीप, यशोधन यूथ फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी पवार यांच्याकडून 1 फ्रीज, जय महाराष्ट्र बझार- 5 गिफ्ट हॅम्पर, माहेर फार्मिंग ज्वेलर्स कराड-1 ग्रॅम ज्वेलरीचे 5 गिफ्ट, अंतरंग हॅण्डलूम- 5 गिफ्ट हॅम्पर (1 हजार रुपयांचे किचन वेअर प्रॉडक्ट), जाधव वॉच अॅण्ड ऑप्टीकल्स- 10 हॅण्डवॉच, सूरज ट्रेडर्स- 1 ओव्हन, सोलंकी गोल्ड- 3 सोन्याच्या नथी, हॉटेल डस्क मेडोज- 1 मायक्रो ओव्हन, 1 मिक्सर, 3 साड्या अशी बक्षिसे सभासद महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहेत.
माहेर फार्मिंग ज्वेलर्स, कराड यांच्याकडून सर्व सभासदांना नथ, गंठण वाट्या, पेंडंट या तिन्हीपैकी 1 वस्तू मोफत मिळणार आहे. हॉटेल एस. के. यांच्याकडून मसुरा डिश मोफत मिळणार आहे. हॉटेल डस्क मेडोज व्हेज-नॉन व्हेज, वन पोर्शन डिश फ्री, हॉटेल गार्डन 2 व्हेज थाळीवर 1 व्हेज थाळी फ्री, जाधव वॉच अॅण्ड ऑप्टीकल्स यांच्यावतीने कस्तुरी सभासद व त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी मोफत डोळे तपासणी. युनिक पार्लरच्यावतीने ब्लीच व आयब्रो फ्री दिला जाणार आहे. यशोदाई कॉम्प्युटरच्यावतीने सभासद व त्यांच्या मुलांसाठी बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण फ्री दिले जाणार आहे. ऑलक्युअर फार्मास्युटीकल्सकडून पहिल्या 100 सभासदांना 285 रुपयांचा फेस वॉश फ्री दिला जाणार आहे. लाईफ केअर लॅबोरेटरी यांच्याकडून सभासद महिलांचे रक्तगट तपासणी मोफत.
माहेर ज्वेलर्स कराड यांच्याकडून खरेदीवर 50 टक्के सूट. जाधव वॉच अॅण्ड ऑप्टीकल्समध्ये चष्मा खरेदीवर 15 टक्के सूट. प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरीसाठी फक्त औषध व तपासणी खर्च, बाकी सर्व मोफत दिले जाणार आहे. मोरया आयुर्वेदिक क्लिनिक यांच्यावतीने हेअर्स स्पा ट्रीटमेंटसाठी 20 टक्के सूट, सौंदर्य प्रसाधनावर 10 टक्के सूट आणि पंचकर्म उपचारावर 20 टक्के सूट दिली जाणार आहे. लाईफ केअर लॅबोरेटरी यांच्याकडून अनेक तपासण्या 1500 मध्ये तर स्पेशल तपासण्यांवर 30 टक्के सूट दिली जाणार आहे. हरिप्रिया नेत्रालय यांच्यावतीने चष्मा खरेदीवर सवलत, मोफत चेकअप, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर 20 टक्के सूट दिली जाणार आहे.