सांगली : वारणेवरील चार पूल पाण्याखाली; चरण-सोडोंली पुलावर पाणी | पुढारी

सांगली : वारणेवरील चार पूल पाण्याखाली; चरण-सोडोंली पुलावर पाणी

चरण; पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात पाचव्या दिवशीही अतिवृष्टी सुरुच होती. चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीला पूर आला आहे. वारणा नदीवरील आरळा-शित्तूर, चरण – सोंडोली, कोकरुड- रेठरे, मांगले-सावर्डे पूल पाण्याखाली गेल्यामुळे शिराळा, शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरात सुरू असणार्‍या अतिवृष्टीच्या पावसामुळे सोनवडे येथील स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे चांदोली परिसरात शिवारात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत. परिसरातील नदीकाठची भात, ऊस पिके पाण्याखाली गेली आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 148 मिलीमीटर अतिवृष्टीचा पाऊस पडला असून, आजअखेर 1 हजार 980 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे.

Back to top button