सांगली : बुधगावातील वृद्धाचा मृत्यू; चालकावर गुन्हा | पुढारी

सांगली : बुधगावातील वृद्धाचा मृत्यू; चालकावर गुन्हा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बुधगाव (ता. मिरज) येथील रामकृष्ण आप्पासाहेब मुळीक (वय 50) यांना जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवाहतूक छोटा हत्ती टेम्पोच्या चालकाविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी प्रकाश जाधव (रा. खणभाग, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. मृत मुळीक हे बायपास रस्त्यालगत एका वाहन शोरुममध्ये रात्रीच्यावेळी रखवालदाराचे काम करीत होते. बुधवारी रात्री ते सायकलवरून कामाला येत होते. त्यावेळी संशयित जाधव हा दारूच्या नशेत त्यांच्या ताब्यातील छोटा हत्ती (क्र. एमएच 10 डीटी-423) भरधाव वेगाने चालवित होता.

जाधव हा सांगलीहून माधवनगरला निघाला होता. चिंतामणीनगर रेल्वे पुलावर गेल्यानंतर समोरून येणार्‍या मुळीक यांना जोराची धडक दिली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जाधवच्या गाडीचेही 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे.

Back to top button