सांगली : महिला वकिलाची सांगलीत पर्स लंपास | पुढारी

सांगली : महिला वकिलाची सांगलीत पर्स लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील अ‍ॅड. तृप्ती शिवाजी साळुंखे (वय 34, रा. दक्षिण शिवाजीनगर, सांगली) यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. यामध्ये रोकड व कागदपत्रे होती. दि. 3 ऑगस्ट रोजी विजयनगर येथील न्यायालयात बार रुम क्रमांक चारमध्ये ही घटना घडली.

तृप्ती साळुंखे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सॅकमध्ये पर्स ठेवली होती. यामध्ये तीन हजाराची रोकड, वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे आयकार्ड होते. सायंकाळी घरी जाताना त्यांनी सॅक उलडल्यानंतर पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button