Sangli : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगलीकर करणार अविस्मरणीय | पुढारी

Sangli : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगलीकर करणार अविस्मरणीय

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीकर शहरवासीयांतर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय सांगली शहरातील सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था यांनी घेतला.

सांगलीत यासाठीच्या झालेल्या बैठकीत स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

लेसर शो, स्वातंत्र्यदिनातील योगदान असणार्‍या शहिदांचे योगदान, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा मशाल मोर्चा, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे सजावट व विद्युत रोषणाई करण्यासाठी आणि ध्वजारोहण समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. सांगलीकर हे 14 ऑगस्टच्या रात्री देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊन तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी जमा होतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लवकरच समन्वय समिती बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर मंथन करून मसुदा तयार केला जाणार आहे.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शरद शहा, सागर घोडके, सतीश साखळकर, विकास मगदूम, महेश पाटील, उमेश देशमुख, शाहीन शेख, राजकुमार राठोड, संजय पाटील, जगन्नाथ ठोकळे, सदाशिव मगदूम, मुस्तफा मुजावर, आनंद देसाई, प्रशांत भोसले, तोफिक शिकलगार, मयूर पाटील, युवराज शिंदे, सौरभ कदम, रवी सांगोलकर, ज्योती आदाटे, प्रियंका तुपलोंढे, महालिंग हेगडे इत्यादी उपस्थित होते.

Back to top button