सांगली : अग्रणी नदीला पूर; कवठेमहांकाळ तालुक्यात दमदार पाऊस | पुढारी

सांगली : अग्रणी नदीला पूर; कवठेमहांकाळ तालुक्यात दमदार पाऊस

कवठेमहांकाळ; पुढारी वत्तसेवा : कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले. पावसामुळे तालुक्यातील काही गावातील ओढे, नालेे भरून वाहत होते. हिंगणगाव आणि मोरगाव, अग्रण धुळगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहू लागल्याने बराच काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 5) दुपारी बारानंतर नदीच्या पात्रातील पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव, ढालगाव, मळणगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती. हिंगणगाव, मोरगाव पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.

Back to top button