सांगली : करंजे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश | पुढारी

सांगली : करंजे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश

विटा : पुढारी वृत्तसेवा; खानापूर तालुक्यातील करंजे येथे यादव मळा परिसरात अशोक नारायण यादव यांच्या मालकीच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वनविभागाच्या सहाय्याने ग्रामस्थांनी बाहेर काढले. हा कोल्हा पहाटेच्या विहिरीत पडलेला होता.

याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून करंजे हिवरे परिसरामध्ये सातत्याने रात्रीच्या वेळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वन्यजीव सुद्धा पिकाच्या झाडांच्या आडोशाला येऊन निवारा शोधत आहेत आज पहाटे पाच वाजले पूर्वी करंजे येथील अशोक यादव यांच्या विहिरीत एक कोल्हा पडला होता. तो मोठमोठ्याने ओरडत वर येण्याचा प्रयत्न करीत होता परंतु विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे तो वर येऊ शकत नव्हता. विहिरीच्या काठावरून वारंवार त्याचे पाय घसरत होते. याबाबत तेथील काही रहिवाशांनी ही गोष्ट वन विभागाला कळवली. त्यानंतर त्वरित अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाठवून कोल्हा बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आणि अर्धा पाऊन तासाच्या प्रयत्नानंतर वन विभाग कर्मचारी तानाजी यादव, चंद्रकांत मंडले, भास्कर यादव, परसु सूर्यवंशी, सचिन यादव, उत्तम यादव, सुरेश यादव, सागर यादव, भरत यादव आणि प्रकाश यादव आदींनी मोठ्या प्रयत्ना नंतर विहिरीतून या कोल्हास बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा

Back to top button