माणिकनाळ येथे तेरा लाख, चाळीस हजारांचा गांजा जप्त | पुढारी

माणिकनाळ येथे तेरा लाख, चाळीस हजारांचा गांजा जप्त

जत ;पुढारी वृत्तसेवा : माणिकनाळ (ता. जत) येथे डाळिंब बागेत गांजा लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून एकशे तेहतीस किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत तेरा लाख चाळीस हजार इतकी होते. याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली (रा.माणीकनाळ) यांच्यावर मानवी मनावर परिणाम करणारे अमलीपदार्थांची जोपासना केल्याप्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयित आरोपी बगली फरार आहे. ही कारवाई उमदी पोलिसानी बुधवारी (दि .३) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत कर्नाटक सीमावर्ती भागातील माणिकनाळ येथे डाळिंबाच्या बागेत बगली यांनी बेकायदेशीर गांजा लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी माहिती मिळाली होती. याबाबत पवार यांनी पोलीस उपाअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. यावेळी डाळींब बागेत गांजाची पाच ते सात फुटाची झाडे शेतातून बाहेर काढण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन एकशे तेहतीस किलो वजन झाले.

सद्यस्थितीत बाजार भावाप्रमाणे या गांजाची किंमत तेरा लाख चाळीस हजार इतके होते. माणिकनाळ येथून आरोपी फरार झाला असून त्यांचा शोध उमदी पोलीस करत आहेत. बगली यांच्यावर उमदी पोलिसात पोलीस नाईक श्रीशैल बिसलाप्पा वळसंग यांनी गुंगीकारक औषधी द्रव्य जोपासना केल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार ,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात,नितीन पलुसकर , नामदेव काळेल,श्रीशैल वळसंग, पुजा घार्गे , शिवाजी हाके,सिध्देश्वर मोरे यांनी केली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button