सांगली : 16 गटांच्या आरक्षणावर 14 हरकती | पुढारी

सांगली : 16 गटांच्या आरक्षणावर 14 हरकती

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या गटांत महिला आरक्षणाची सोडत चुकीच्या पद्धतीने झाली आहे. अशा 16 गटांसाठी एकूण 14 हरकती दाखल झाल्या आहेत. आलेल्या हरकतीवर शुक्रवार, दि. 5 रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. जि. प. च्या एकूण 68 गटांची आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वी काढण्यात आली आहे. सोडत जाहीर झाल्यापासून अनेक गटांच्या आरक्षण सोडतीवरून मतमतांतरे व्यक्त होत होती. काही ठिकाणी आरक्षण सोडत योग्य पद्धतीने झाली नसल्याची चर्चा होत होती. यातून महिला आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीने काढली आहे, अशा जिल्ह्यातील 16 गटातील 14 हरकती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडे आल्या आहेत.

जिल्हा निवडणूक आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतीच्या गटांची नावे अशी ः शेगाव, देशिंग, वांगी, बिळूर, करंजे, कुची, बावची, एरंडोली, लेंगरे, भाळवणी, दुधोंडी, सागाव, हरिपूर, म्हैसाळ, भिलवडी, सावंतपूर अशा एकूण 16 गटावर 14 हरकत दाखल झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या गटांवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, दि. 5 रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. यातील ज्या हरकती मान्य केल्या जातील, त्या हरकतीवर पुढील सुनावणी होणार आहे, अन्यथा या सर्वंच गटांच्या आरक्षणावर त्याच दिवशी अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Back to top button