सांगली : मोबाईल चोरट्याला मनसे पदाधिकाऱ्यांचा चोप | पुढारी

सांगली : मोबाईल चोरट्याला मनसे पदाधिकाऱ्यांचा चोप

जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी सायंकाळी बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. त्यानंतर चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत येथे मंगळवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना घडतच असतात. तर गेल्या काही दिवसांपासून बस स्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी जत बसस्थानक परिसरात दोन महिलांचे मोबाईल व पाकीट चोरण्याचा दोघांनी प्रयत्न केला. यावेळी मनसे वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष बिरा मोटे व शरद चव्हाण यांनी चोरट्यांना पकडले व चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा :

Back to top button