सांगली : बोअरला पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी

सांगली : बोअरला पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

जत: पुढारी वृत्तसेवा : बसर्गी (ता. जत) येथे शेतात बोअर मारूनही पाणी कमी लागल्याने तसेच कर्जाचा बोजा झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. बाबू ईश्वर बामणे (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,बाबू ईश्वर बामणे यांची गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेती आहे. काही महिन्यापूर्वी शेतात ८०० फूट बोअर मारली होती. परंतु या बोअरला पाणी कमी लागले होते. तसेच कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यांनी ऊस लागवड केली होती. त्याचबरोबर शेतीमुळे कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. याच नैराश्यातुन त्यांने आत्महत्या केली. या घटना नोंद जत पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button