सांगलीत तलवारीने दहशत; एकास अटक | पुढारी

सांगलीत तलवारीने दहशत; एकास अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील शंभरफुटी रस्त्यावरील एका हॉटेलजवळ तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या अनिकेत श्रीकांत नाटेकर (वय 21, रा. सावंत प्लॉट, पहिली गल्ली, इंदिरानगर, सांगली) याला रविवारी अटक करण्यात आली.

रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एक तरुण तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षात मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नाटेकरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार तसेच त्याच्या ताब्यातील दुचाकी जप्त केली.

त्याच्याविरूद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने तलवार कोठून आणली? तो कशासाठी बाळगत होता? याबद्दल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेत असलेल्या नाटेकर याला सोमवार, दि. 25 जुलैरोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

Back to top button