मिरज : तीन सावकारांवर गुन्हा दाखल | पुढारी

मिरज : तीन सावकारांवर गुन्हा दाखल

मिरज : पुढारी वृत्तसेवा :  55 हजाराच्या मोबदल्यात साडेतीन लाखाची वसुली करून देखील आणखी 1 लाख 84 हजाराची मागणी केली. याप्रकरणी नसीम मुबारक सतारमेकर यांनी तिघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सर्फराज असलम देसाई (वय 40), आणि शन्नो सर्फराज देसाई (वय 30, दोघे रा. सुंदरनगर, मिरज) आणि मोहसीन मुनाफ शहापूरे (वय 28, रा. ताशिलदार गल्ली, मिरज) या तिघा खासगी सावकारांचा समावेश आहे.
वसीम सतारमेकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी सर्फराज देसाई यांच्याकडून 55 हजार रुपये घेतले होते. दररोज 1500 रुपये याप्रमाणे हप्ता देण्याचे ठरलेनुसार नसीम सतारमेकर यांनी आतापर्यंत साडेतीन लाख रुपयांची परतफेड देखील केली होती. देसाई याचा वसुली एजंट मोहसीन शहापूरे हा वारंवार येऊन पैसे घेऊन जात होता. मूळ मुद्दलासह पैशांची परतफेड केली असतानाही आणखी 1 लाख 84 हजार येणे बाकी असल्याचे सांगत नसीम सतारमेकर यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात येत होती. असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button