सांगली : आठ लाख लाभार्थ्यांना मिळणार ‘बूस्टर डोस’ | पुढारी

सांगली : आठ लाख लाभार्थ्यांना मिळणार ‘बूस्टर डोस’

सांगली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 15 जुलैपासून पुढील 75 दिवस 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केेद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात बूस्टर डोससाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या 8 लाख 50 हजार आहे. या लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तयारी करण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधचे पहिले दोन डोस घेतल्यानंतर आणि 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येतो. बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र लाभार्थी संख्या 8 लाख 50 हजार आहे.

काही दिवसांपासून खबरदारी म्हणून हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना आरोग्य केंद्रांमध्ये मोफत बूस्टर डोस देण्यात आला आहे. 60 टक्के हेल्थ वर्कर कर्मचार्‍यांनी आणि 50 ते 55 टक्के फ्रंटलाईन वर्कर कर्मचार्‍यांनी बूस्टर डोस घेतला आहे. उर्वरित कर्मचार्‍यांचे लसीकरण अद्यापही सुरू आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारपासून मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत याची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 64 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय तसेच मनपा क्षेत्रातील आरोग्य केंंद्रांमध्ये याची व्यवस्था करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची केंद्रांत जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button