मिरज येथे सलून दुकानावर दगडफेक; ब्लेडने हल्ला | पुढारी

मिरज येथे सलून दुकानावर दगडफेक; ब्लेडने हल्ला

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील ख्वॉजा वस्ती येथे मिशी कट न केल्याच्या रागातून संशयिताने सलून दुकानावर दगडफेक केली. तसेच दुकानदारावर ब्लेडने हल्ला केला. दुकानदार अर्जुन गोविंद जाधव हे जखमी झाले. सोहेल उर्फ चुआ निजाम सोलकर (वय 30 रा. ख्वॉजा वस्ती, मिरज) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अर्जुन जाधव यांचे ख्वॉजा वसाहतमध्ये सलून दुकान आहे. सोमवारी सकाळी सोहेल हा सलूनमध्ये आला. त्याने अर्जुन यांना मिशी कट करण्यास सांगितले. त्यावेळी ‘थोडा वेळ थांब एक गिर्‍हाईक करून भवानी होवून दे, मग तुझी मिशी कट करून देतो’ असे सांगितले. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर सोहेल हा सलून बाहेर जावून त्याने सलूनच्या काचेवर दगड मारून काच फोडली. अर्जुन याला मारहाण करून त्यांच्यावर ब्लेडने हल्ला केला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button