सांगली : विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू | पुढारी

सांगली : विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

येडेनिपाणी (सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्‍हातील येडेनिपाणी येथील दत्तात्रय बाळू कोकरे (वय ३२ ) तरुणाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना  प्रकाश साळुंखे यांच्या शेतात सोमवारी दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, दत्तात्रय कोकरे हा दुपारी प्रकाश साळुंखे यांच्या शेतातील बांधावरील तण काढत होता. यावेळी बांधावर असलेल्या विजेच्या खांबाच्या आर्थीगच्या तारेला त्याचा हात लागला. पावसामूळे या तारेत वीज उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहीती मिळताच कुळप पोलीस ठाण्याचे घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय कोकरे याच्या पश्चात पत्नी, पुलगा व मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा

पूर्व विदर्भात पुढील 24 तासांत पूरस्थितीची शक्यता; गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट

 

Back to top button