विटा : मातंग समाजाकडून विधवा प्रथेला मूठमाती | पुढारी

विटा : मातंग समाजाकडून विधवा प्रथेला मूठमाती

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा येथील मातंग समाजात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भिंगारदेवे यांचे बंधु विठ्ठल भिंगारदेवे यांचे निधन झाले. यावेळी भिंगारदेवे कुटुंबीयांनी याची अंमलबजावणी करून मातंग समाजात वेगळा पायंडा पाडला आहे.

अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत रक्षाविसर्जन आणि अन्य धार्मिक विधींना महिलांना नेण्याची प्रथा होती. तसेच पतीच्या निधनावेळी पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळयातील मंगळसूत्र काढणे, पायातील जोडवे काढणे, हातातील बांगड्या काढणे अशी प्रथा होती. स्त्री म्हणून ही एक प्रकारची अवहेलना असल्याने विधवा प्रथेचे निर्मुलन होणे आवश्यक होते.

भिंगारदेवे कुटुंबियांनी त्यांचे चुलते दामोदर भिंगारदेवे यांच्या निधनानंतर महिलांना स्मशान भूमीत नेण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भिंगारदेवे आणि विटा मर्चंट्स बँकेचे संचालक दलित मित्र रामचंद्र भिंगारदेवे यांचे बंधू विठ्ठल भिंगारदेवे यांचे नुकतेच निधन झाले. शुक्रवारी त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. भिंगारदेवे कुटुंबियांनी या प्रथेचे निर्मुलन करुन मातंग समाजात वेगळा पायंडा पाडला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button