Municipal Elections 2022 : सांगली जिल्ह्यात ५ नगरपालिकांची रणधुमाळी | पुढारी

Municipal Elections 2022 : सांगली जिल्ह्यात ५ नगरपालिकांची रणधुमाळी

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : पालिका निवडणुकांची (Municipal Elections 2022) २२ जुलै पासून रणधुमाळी सुरु होत आहे. जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा, पलूस, तासगाव या पाच नगरपालिकांसाठी दि. १८ ऑगस्टला मतदान होणार आहे. तर १९ ला मतमोजणी होणार आहे. आज रात्रीपासूनच निवडणुकीची आचारसंहिताही लागू होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्याने नगरपालिकांची प्रभाग रचना बदलणार, नगराध्यक्ष पद थेट जनतेतून होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच शुक्रवारी निवडणूक आयोगाने (Municipal Elections 2022) राज्यातील पालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. दि. २० जुलैला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी दि. २२ जुलै ते दि. २८ जुलै दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २९ तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज माघारीची मुदत ४ आँगस्टपर्यंत आहे. १८ ऑगस्टला मतदान होणार असून लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ तारखेला मतमोजणी होणार आहे.

सांगली जिल्हातील निवडणूक (Municipal Elections 2022) कार्यक्रम जाहीर झालेल्या इस्लामपूर नगरपालिकेत १५ प्रभाग व ३० सदस्य आहेत. विटा पालिकेत १३ प्रभाग व २६ सदस्य, आष्टा पालिकेत १२ प्रभाग व २४ सदस्य, पलूस पालिकेत १० प्रभाग व २० सदस्य तर तासगाव पालिकेत १२ प्रभाग व २४ सदस्य संख्या आहे. अर्ज माघारीपासून ते मतदानापर्यंत केवळ १२ दिवस प्रचारासाठी मिळणार असल्याने उमेदवार व राजकीय पक्षांचीही मतदारांच्यापर्यंत पोहोचताना तारांबळ उडणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता राजकीय हालचाली गतीमान होणार आहे.

Back to top button