सांगली विरोधकांच्या एकजुटीमुळे शिक्षक बँकेत सत्तांतर | पुढारी

सांगली विरोधकांच्या एकजुटीमुळे शिक्षक बँकेत सत्तांतर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी मंडळाचा धुव्वा उडाला. सत्ताधार्‍यांविरोधात एकत्रित आलेल्या बारा संघटना, त्यांची एकजूट, सभासदांतील नाराजी, भ्रष्टाचाराच्या आरोपाचा मुद्दा यामुळे बारा वर्षानंतर सत्तांतर झाले.

खरे तर निवडणुकीस दोन महिने असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. सत्ताधारी गटाने उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. तर शिक्षक संघाचे नेते विनायकराव शिंदे यांनी सत्ता मिळवायचीच, या दृष्टीने तयारी सुरू केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटपर्यंत ते सर्व विरोधकांना एकजूट करण्याच्या प्रयत्नात होते. गेल्या निवडणुकीत मतविभजनाचा फटका त्यांना बसला होता. यावेळी मात्र दुरंगी निवडणूक कशी होईल, यासाठी त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न होते. शिक्षक समिती पुरस्कृत सत्ताधारी पुरोगामी पॅनेलला माजी स्व. आमदार शि. द. पाटील (माधवराव पाटील) शिक्षक संघ गटाबरोबर शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य उर्दू संघटना, शिक्षक सहकार संघटनेने पाठिंबा दिला होता. विरोधी शिक्षक संघ (थोरात गट) पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक मंडळाला संघाच्या शि. द. पाटील (धैर्यशील पाटील) गटासह जुनी पेन्शन संघटना, आदर्श शिक्षक समिती, दिव्यांग कर्मचारी शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक भारती संघटनेसह बारा संघटनांनी पाठिंबा दिला होता

शेवटच्या टप्प्यात माजी आमदार कै. शि. द. पाटील यांचे चिरंजीव महादेव पाटील यांनी सत्ताधारी गटास पाठिंबा दिला. मात्र शि. द. पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील हे स्वाभिमानीकडे होते. त्यांनी सत्ताधार्‍यांचे सर्व आरोप खोडून काढले.

सत्ताधारी गटाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली होती. मात्र त्याचा फायदा निवडणुकीत सत्ताधार्‍यांना झाला नाही.

बँकेत आम्ही चांगले काम केले. मात्र सर्व विरोधक एकत्र येणे, सलग बारा वर्षाची सत्ता असल्याने झालेली काही प्रमाणात नाराजी याचा फटका आम्हाला बसला. सोलापूर जिल्ह्यात मताधिक्क्य मिळाले. मात्र जिल्ह्यात काही तालुक्यात आम्ही कमी पडलो. बँक, सभासदांच्या हितासाठी काम करत राहणार आहे.
– विश्‍वनाथ मिरजकर,
शिक्षक समितीचे नेते
म्हैसाळ हत्याकांडातील संशयित विजयी
गेल्या महिन्यात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे नऊ जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये शामगोंडा पाटील हे शिक्षक संशयित म्हणून कोठडीत आहेत. ते स्वाभिमानीच्या पॅनलमधून निवडणुकीस उभे होते. ते या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून निवडून आले.
शिक्षक बँकेत सत्ताधार्‍यांची मनमानी, स्वार्थी कारभाराला सभासद वैतागले होते. सत्ताधार्‍यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात सभासद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सभासदांना रुचला नाही. त्यांना सभासदांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. सभासद, बँकेच्या हिताचे काम आम्ही करणार आहे.
– विनायकराव शिंदे,
शिक्षक संघाचेे नेते
येणारी वाहने अस्ताव्यस्त उभी केलेली आहेत.
या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण केले होते. तसेच अतिक्रमणे काढली होती, पण आता परिस्थिती पुन्हा तशीच झाली आहे.

Back to top button