थबडेवाडी खून प्रकरण : कवठेमहांकाळ पोलिसांकडून दोघांना अटक   | पुढारी

थबडेवाडी खून प्रकरण : कवठेमहांकाळ पोलिसांकडून दोघांना अटक  

कवठेमहांकाळ ; पुढारी वृत्तसेवा : थबडेवाडी खून प्रकरण : थबडेवाडी (ता. कवठेमंकाळ) येथील भरत ज्ञानदेव खोत (वय ३७) याचा शुक्रवारी निर्घृण झाला. खूनप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी शनिवारी दोन प्रमुख संशयित आरोपींना अटक केली.

थबडेवाडी खून प्रकरण मध्ये भगवान रंगराव खोत (वय ३७) राहणार थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि आकाश मधुकर खोत (वय १९) राहणार खैरावकर मळा विठुरायाचीवाडी (ता.कवठेमहांकाळ) अशी त्या दोघांची नावे आहेत.

शुक्रवारी रात्री थबडेवाडी गावातील भरत ज्ञानदेव खोत याच्या घरासमोर दोन हल्लेखोरांनी धारदार हत्याराने डोक्यात व तोंडावर वार करुन भरतचा खून केला. हल्ल्यानंतर मारेकरी पळून गेले होते.

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन भरत खोत याचा खून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तसेच दोन संशयित हर्लेखोरांची नावे  तपासात निष्पन्न झाली होती.

संशयित आरोपी पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी पथके रवाना केली होती.

दरम्यान खून प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपी कोकळे (ता.कवठेमहांकाळ) गावामध्ये येणार असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली.

यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोन संशयित आरोपी पकडले.

पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबूले, उपअधिक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक अक्षय, ठिकणे, हवालदार विजय घोलप, राजू मानवर, पोलिस नाईक विक्रम चव्हाण, सयाजी पाटील, दादासाहेब ठोंबरे, चंद्रसिंग साबळे, सुहास चव्हाण, विनोद चव्हाण, निवृत्ती कारंडे यांच्या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे करत आहेत.

Back to top button