अनैतिक संबंधाच्या संशयावरुन थबडेवाडीतील तरुणाचा खून | पुढारी

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन थबडेवाडीतील तरुणाचा खून

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन धरधार हत्याराने डोक्यावर वार करत थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील भरत ज्ञानदेव खोत वय ३५ याचा खून करण्यात आला. सदरची घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन झालेल्या खून प्रकरणी संशयित भगवान रंगराव खोत वय ३७ रा थबडेवाडी (ता.कवठेमहांकाळ ) याचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ; मयत भरत खोत याचे थबडेवाडी गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याचा राग मनात धरुन महिलेच्या नात्यातील भगवान रंगराव खोत याने रात्री आडेआठच्या सुमारास गावात जिल्हा परिषद शाळेजवळ भरत खोत याच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी भरतचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

थबडेवाडी येथील भरत खोतच्या खूनाची माहिती कवठेमहांकाळ समजताच पोलीस उप अधिक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, पोलिस हवालदार राजेंद्र मानवर, चंदरसिंग साबळे, विक्रम चव्हाण या पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मयत भरत ज्ञानदेव खोतचा मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. काल रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचले का?

Back to top button