अनैतिक संबंधाच्या संशयावरुन थबडेवाडीतील तरुणाचा खून
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन धरधार हत्याराने डोक्यावर वार करत थबडेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील भरत ज्ञानदेव खोत वय ३५ याचा खून करण्यात आला. सदरची घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली आहे.
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन झालेल्या खून प्रकरणी संशयित भगवान रंगराव खोत वय ३७ रा थबडेवाडी (ता.कवठेमहांकाळ ) याचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आले पण ठराविक पदाधिकार्यांच्या चौकटीतच अडकले
- हनीट्रॅप : विद्यार्थ्याकडून टोळीने उकळले २० लाख, घाबरून तक्रारीस टाळाटाळ
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ; मयत भरत खोत याचे थबडेवाडी गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याचा राग मनात धरुन महिलेच्या नात्यातील भगवान रंगराव खोत याने रात्री आडेआठच्या सुमारास गावात जिल्हा परिषद शाळेजवळ भरत खोत याच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी भरतचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
थबडेवाडी येथील भरत खोतच्या खूनाची माहिती कवठेमहांकाळ समजताच पोलीस उप अधिक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, पोलिस हवालदार राजेंद्र मानवर, चंदरसिंग साबळे, विक्रम चव्हाण या पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
- तहसिलदार ज्योती देवरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा : देवेंद्र फडणवीस
- कागल : सोनाळीच्या मारुती वैद्यकडून वरदच्या खूनाची कबूली पण (घटनाक्रम)
मयत भरत ज्ञानदेव खोतचा मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. काल रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचले का?