सांगली, मिरजेतील दोन बालकांना कोरोना | पुढारी

सांगली, मिरजेतील दोन बालकांना कोरोना

मिरज : पुढारी वृत्तसेवा सांगलीत साप चावलेल्या बालकाला कोरोना झाला आहे. शुक्रवारी त्याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान शुक्रवारी रात्री मिरजेत राहणार्‍या 8 वर्षाच्या बालिकेलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आठ वर्षांच्या बालकाला साप चावल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तोपर्यंत त्याचे शरीर लुळे पडले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. 10 दिवसात त्याची प्रकृती ठणठणीत झाली. आज त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, मिरजेत राहणार्‍या 8 वर्षांच्या बलिकेला त्रास होऊ लागल्याने गुरुवारी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या बालिकेची कोरोना तपासणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तिला शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या स्वतंत्र विभागात हलविण्यात आले आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कोरोनाचा विभाग अद्याप सुरूच आहे.

Back to top button