मिरज जंक्शनमार्गे धावणार बारा एक्स्प्रेस गाड्या | पुढारी

मिरज जंक्शनमार्गे धावणार बारा एक्स्प्रेस गाड्या

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड स्थानकातील यार्डात सबवेचे (रोड अंडर ब्रिज) काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. १३ ते २९ मे दरम्यान पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणार्‍या १२ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या कुर्डुवाडी-मिरज-पुणे मार्गे धावणार आहेत.

मिरज मार्गे धावणार्‍या गाड्यांमध्ये पुणे-भुवनेश्वर, विशापट्टणम – एलटीटी, एलटीटी – विशाखापट्टनम, काकीनाडा पोर्ट- एलटीटी, एलटीटी – काकीनाडा पोर्ट, मुंबई – नागरकोईल एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस – मुंबई, तिरुवंतपूरम सेंट्रल – मुंबई, मुंबई – नागरकोईल एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस – मुंबई सेंट्रल, एलटीटी – कराईकल एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी – चेन्नई सेंट्रल या एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे

Back to top button