कामगारांमधील ठेकेदारी मोडून काढणार : उदय सामंत | पुढारी

कामगारांमधील ठेकेदारी मोडून काढणार : उदय सामंत

सांगली, पुढारी वृत्तसेवा : “असंघटित कामगारांना पुरेसे वेतन आणि न्याय मिळत नाही. या कामगाऱ्यांच्यात काही ठेकेदार तयार झाले आहेत. ही ठेकेदारी मोडून काढण्यात येईल. प्रसंगी त्यासाठी मंत्री असलो तरी मी आंदोलन करून कामगारांना न्याय मिळवून देणार”, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे बोलताना केले.

सांगलीत वसंत दादा सूतगिरणी जवळील चाणक्य चौक येथे कामगार दिनानिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले, “कामगारांना अनेक ठिकाणी न्याय मिळत नाही .त्याची उपेक्षा होते. माझ्याकडे जरी कामगार खात्याचा कार्यभार असला तरी कामगार महामंडळात 1200 कोटी रुपये आहेत. ही रक्कम कामगारांना मिळायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मी ते मिळवून देणार आहे. कामगारांच्यात काही ठेकेदार तयार झाले आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांची मनमानी उद्योग सुरू आहेत. ही ठेकेदारी मोडून काढण्यात येईल. त्यासाठी मी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही करेन.” यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा प्रमुख संजय विभुते, कार्यक्रमाचे संयोजक हरिदास लेंगरे आदींची भाषणे झाली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

नामदार सामंत यांनी गारपिटीचा मोठा फटका बसलेल्या सोनी या गावास भेट दिली. त्या ठिकाणी द्राक्षे आणि मिरची या पिकांचे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी प्रशासनास नुकसानीची पंचनामे करून तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.

Back to top button