सांगली: आंबा…1250 रुपये डझन | पुढारी

सांगली: आंबा...1250 रुपये डझन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली. 1500 रुपये डझन असणारा दर 1250 रुपयांपर्यंत खाली आला आहे. पुढील आवड्यात हा दर एक हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

मागील दोन वर्षात अवकाळी, कोरोनामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे निर्यात ठप्प होती. स्थानिक मार्केटमध्ये आंब्याची रेलचेल होती. यामुळे दरही काहीसे कमी होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे. परिणामी लोकल मार्केटमध्ये आंब्याची आवक जेमतेम आहे. दरही चांगले आहेत.

सांगलीच्या बाजारात 15 दिवसांपासून आंबा येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला दोन हजार ते 1500 रुपये असा डझनाचा दर होता. दोन दिवसांपासून गुढीपाडव्यामुळे तालुक्यातील बाजारातून मागणी वाढली आहे. यातून आवकही वाढू लागली आहे. सध्या दररोज 100 ते 127 क्विंटल आवक होत आहे. प्रतिडझन दर एक हजार ते 1250 रुपयांपर्यंत आहेत.

Back to top button