सांगली जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर उत्पादन | पुढारी

सांगली जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर उत्पादन

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अठरांपैकी 9 सहकारी व 4 खासगी साखर कारखान्यांमध्ये आजअखेर 87 लाख 95 हजार 68 लाख टन उसाचे गाळप झाले आहे तर 99 लाख 93 हजार 395 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गाळपात दत्त शुगर इंडिया सांगली कारखान्याने 10 लाख 80 हजार 315 टन उसाचे गाळप व 11 लाख 80 हजार 900 क्विंटल साखर उत्पादन करून आघाडी घेतली आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिटने 12.65 टक्के उतारा मिळवित अग्रस्थान उतार्‍यात अग्रस्थान पटकावले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात या हंगामात कसेबसे 85 ते 87 लाख टन उसाचे गाळप होईल असे वृत्त दै. ‘पुढारी’मध्ये दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाले होते. हंगामात 87 लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. दै. ‘पुढारी’ चा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

चालू गळीत हंगाम साखर कारखाने, ऊसउत्पादक शेतकरी आणि तोडणी मजूर या सर्वच घटकांसाठी विलक्षण कसोटी पाहणारा ठरला. मात्र ऊसउत्पादकाला एफआरपी एखादा अपवाद वगळता मिळाली नाही. या हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख 22 हजार 340 हेक्टर क्षेत्रात ऊस उपलब्ध होता.

उतार्‍यात सहकारी कारखाने आघाडीवर..!

जिल्ह्यातील नऊ सहकारी कारखान्यांमध्ये 59 लाख 1 हजार 303 टन उसाचे गाळप झाले आहे. 68 लाख 12 हजार 460 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 11.59 टक्के राहिला आहे. चार खासगी साखर कारखान्यात 28 लाख 93 हजार 765 टन उसाचे गाळप झाले आहे. यातून 30 लाख 92 हजार 915 क्विं. साखर उत्पादन झाले आहे. या कारखान्यांचा साखर उतारा 11.01 टक्के आहे.

साखर उत्पादन

Back to top button