kidnapping : खंडणीसाठी युवकाचे अपहरण | पुढारी

kidnapping : खंडणीसाठी युवकाचे अपहरण

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी (kidnapping) चाकूचा धाक दाखवून विकास दादासाहेब माने (वय 31, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) या युवकाचे दोघांनी अपहरण केले. त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. विकास याचे दि.19 मार्च रोजी पेठनाका येथून अपहरण केले होते. संशयितांनी त्याला कोल्हापूर येथे सोडून त्याच्याकडील कार काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तुषार अशोक कोळी (रा. घालवाड रोड, शिरोळ, जि. कोल्हापूर), आशिष माने या संशयितांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा (kidnapping) दाखल झाला आहे. पोलिसांनी तुषार याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आशिष हा फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाच वर्षांपूर्वी विकास हा शिरोळ येथे खासगी कंपनीत काम करीत होता. त्यावेळी त्याची तुषार याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर तुषार याने कराड येथे कँटिन सुरू केले होते. तुषार याच्याकडील कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम विकास हा त्याच्या बँकेच्या अकाऊंटवरून प्रॉव्हिडंट ऑफिस फंडाला वर्ग करत होता. तुषार हा विकास याच्याकडे पैसे मागत होता. तसेच बँकेचे बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी विकास याला सांगत होता. (kidnapping)

दि.17 मार्च रोजी तुषार याने विकास याला फोन केला. आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये पाठव नाहीतर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. विकास याने एनईएफटीद्वारे 1 लाख रुपये तुषार याच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशीही तो पैसे मागत होता.

कारमधून अपहरण… (kidnapping)

दि.19 मार्च रोजी सकाळी विकास हा कारने कराडकडे निघाला होता. तुषार याने पेठनाका येथे विकासला गाठले. कारमध्ये जबरदस्तीने बसवून चाकूचा धाक दाखवला. कार कोल्हापूरला नेण्यास सांगितले. तुषारने मित्र आशिष माने याच्या कोल्हापूर येथील वर्कशॉपमध्ये नेले. दोघांनी ‘5 लाख रुपये आताच्या आता दे, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. विकास याच्या खिशातील 5 हजार रुपये काढून घेतले. कारमध्ये दोघांनी शिवीगाळ करून विकास याला मारहाण केली. गाडीची चावी काढून घेतली. ‘पाच लाख रुपये घेऊन ये, तरच गाडी मिळेल, याची कोठे तक्रार केलीस तर तुला ठार मारू’, अशी धमकी दिली. त्यानंतर विकास हा सायंकाळी कारंदवाडी येथे आला. तो घाबरला होता. त्याने घडलेला प्रकार त्याच्या मामांना सांगितला. त्यानंतर त्याने सोमवारी रात्री उशिरा इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव तपास करीत आहेत.

Back to top button