सांगली : बलात्काराच्या तक्रारीवरून मोराळेतील तरुणाला अटक | पुढारी

सांगली : बलात्काराच्या तक्रारीवरून मोराळेतील तरुणाला अटक

पलूस : पुढारी वृत्तसेवा

दीपक राजाराम पाटील, (वय 26, रा. मोराळे, ता. पलूस) याला बलात्काराच्या तक्रारीवरून शनिवारी अटक करण्यात आली. पीडित तरुणीने तक्रार दिल्याने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पलूस पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे .

दीपक पाटील याने त्याचे लग्न इच्छेविरुध्द झाले आहे, असे त्या तरुणीला सांगितले. तिची फसवणूक केली. विविध लॉजवर तिला नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. तसेच त्याचे व फिर्यादी तरुणीचे फोटो व व्हिडीओ शूटिंग इतरांना दाखविण्याची भीती दाखवली. तिच्या इच्छेविरुध्द डिसेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

Back to top button