केंद्रीय मंत्री गडकरी उद्या सांगली जिल्हा दौर्‍यावर | पुढारी

केंद्रीय मंत्री गडकरी उद्या सांगली जिल्हा दौर्‍यावर

सांगली पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवारी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या 52 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण रस्त्याचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पाची किंमत 2 हजार 76 कोटी रुपये आहे.
बोरगाव ते वाटंबरे या चौपदरी रस्त्यावर एकूण वीस भुयारी मार्ग आहेत. 38 बस शेल्टर आहेत, 4 मोठे पूल, 5 छोटे पूल तर 9 किलोमीटर लांबीचे सर्व्हिस रोड आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी यावरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचे पुनर्वसन आणि उन्नतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाची प्रकल्पाची किंमत 257 कोटी रुपये आहे. या महामार्गांच्या लोकार्पण कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पृथ्वीराज देशमुख यांनी केले आहे.

सकाळी 11.15 वाजता खरे क्लब हाऊस येथे पीएनजी सराफ पेढीच्या मेळाव्याला ना. गडकरी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.15 वाजता उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 2.30 वाजता विश्वचंद्र मंगल कार्यालय, खानापूर रोड, भिवघाट येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

Back to top button