खूशखबर! प्रिपेड रिचार्जसाठी आता 30 दिवसांची व्हॅलिडिटी | पुढारी

खूशखबर! प्रिपेड रिचार्जसाठी आता 30 दिवसांची व्हॅलिडिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रिपेड ग्राहकांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी असणारा किमान एक तरी प्लॅन उपलब्ध करून द्यावा, असे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत.

टेलिकॉम कंपन्यांना ट्रायने दिले आदेश

ट्रायन यासंदर्भात गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी किमान एक तरी असा प्लॅन उपलब्ध करावा, ज्याची कालमर्यादा (व्हॅलिडिटी) 30 दिवसांची असेल. वर्षभरात  ग्राहकांकडून केल्या  जाणार्‍या प्रिपेड रिचार्ज च्या संख्येत कपात होण्याच्या द‍ृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून कंपन्यांनी ग्राहकांना 30 दिवसांच्या कालमर्यादेचा प्लॅन व्हाऊचर, स्पेशल टेरिफ व्हाऊचर किंवा कॉम्बो व्हाऊचर उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी 60 दिवसांच्या आत करावी, असे निर्देशही ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, सध्या टेलिकॉम कंपन्या प्रिपेड ग्राहकांना 28 दिवसांच्या मुदतीचे प्लॅन ऑफर करतात. त्यामुळे एका वर्षात ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करणे भाग पडते. या लुटीविरोधात अनेक ग्राहकांनी ट्रायकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत यात बदल करण्यात आला आहे.

प्रिपेड रिचार्ज – व्होडाफोन, एअरटेलचा विरोध

ट्रायच्या या निर्णयाला व्होडाफोन आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला आहे. 28, 54 आणि 84 दिवसांची व्हॅलिडिटी असणार्‍या कोणत्याही प्लॅनमध्ये बदल केल्यास बिलिंग सायकलमध्ये मोठा गोंधळ निर्माण होईल, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. जिओने मात्र 30 दिवसांच्या रिचार्ज व्हॅलिडिटीस सहमती दर्शविली आहे. मात्र प्रत्येक महिन्याच्या एकाच तारखेस एकाच रकमेचा रिचार्ज ऑफर करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असून पोस्टपेड प्लॅनच्या बाबतीत असे करता येते, असेही जिओकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचलंत का? 

Back to top button