सांगली : माडग्याळ मेंढीला लाखोंचा दर; सहा मेंढ्यांना मिळाली इतकी रक्‍कम. | पुढारी

सांगली : माडग्याळ मेंढीला लाखोंचा दर; सहा मेंढ्यांना मिळाली इतकी रक्‍कम.

माडग्याळ ; पुढारी वृत्‍तसेवा

माडग्याळ तालुका जत येथील मायाप्पा चौगुले या शेतकऱ्यांच्या सहा माडग्याळ मेंढीची विक्री तब्‍बल १४ लाखांमध्ये करण्यात आली. यावेळी गावातून या मेंढ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ येथील पशुपालक शेतकरी मायाप्पा चौगुले यांच्या 6 मेंढया रमेश कराळे यांनी 14 लाख रूपयांमध्ये विकत घेतल्या.

इतक्‍या विक्रमी किंमतीला मेंढ्यांची विक्री झाल्‍याने मेंढ्यांची गावातून हलगी लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ मेंढीचे चांगले रुबाबदार नाक, चांगले चविष्ट मटण हे प्रसिद्ध असल्यामुळे माडग्याळ मेंढीचा भाव वाढला आहे. दुष्काळी पट्टयामध्ये कमीत कमी चारा खाऊन चांगले उत्पन्न देणारी माडग्याळ मेंढीला चांगला दर मिळाल्यामुळे पशु पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button