तासगाव : आता रंगणार फड सोसायट्यांचा! - पुढारी

तासगाव : आता रंगणार फड सोसायट्यांचा!

तासगाव : विठ्ठल चव्हाण
तालुक्यात मार्च दरम्यान विकास सोसायटींच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तिसर्‍या टप्प्यातील निवडणुका संपताच पाचव्या व सहाव्या टप्प्यातील विकास सोसायट्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा उपनिबंधक यांनी तासगावचे सहायक निबंधक यांना तालुक्यातील उर्वरित 33 विकास सोसायटींच्या प्रारूप मतदार याद्या तयार करून पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुका विकास सोसायटींच्या निवडणुकीनंतर घेण्याचे आदेश न्यायालयाने सहकार प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने उर्वरित सर्व टप्प्यातील विकास सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केल्या आहेत. प्रारूप याद्या तयार करून परत थकबाकीदार सभासदांनी कर्ज न भरल्यास मतदार यादीतून नावे वगळण्याची नोटीस बजावून हरकतीला वेळ देऊन याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. या निवडणुकांमुळे गावपातळीवर सोसायट्या ताब्यात ठेवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यात या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. इतर पक्ष, संघटनांची ताकद नगण्य असल्याने त्यांची भूमिका दुय्यम ठरणार आहे. तासगाव बाजार समितीची निवडणूक लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आपली व्यूहरचना सुरू केली असल्याने या निवडणुका चुरशीची आणि ताकतीने लढविल्या जातील, असे वातावरण निर्माण केले आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणूक होणार्‍या विकास सोसायट्या

1) श्री विठ्ठलदेव विकास सोसायटी लि., आळते 2) मांजर्डे (जुनी) विकास सोसायटी लि., मांजर्डे 3) तासगाव विकास सोसायटी लि., तासगाव 4) नागाव विकास सोसायटी लि., नागाव-कवठे 5) शिरगाव विकास सोसायटी लि., शिरगाव कवठे 6) कै. महावीर साळुंखे विकास सोसायटी लि., मणेराजुरी 7) बस्तवडे विकास सोसायटी लि. बस्तवडे 8) गौरगाव विकास सोसायटी लि., गौरगाव 9) सिध्देश्‍वर विकास सोसायटी लि., नरसेवाडी 10) ढवळी विकास सोसायटी लि., ढवळी 11) तुरची विकास सोसायटी लि., तुरची 12) जय हनुमान विकास सोसायटी लि., निमणी 13) पुणदी विकास सोसायटी लि., पुणदी 14) श्री वीरभद्र विकास सोसायटी लि., सिध्देवाडी 15) सावर्डे विकास सोसायटी लि., सावर्डे 16) नागनाथ विकास सोसायटी, नागाव निमणी 17) विसापूर विकास सोसायटी, विसापूर 18) शिरगाव विकास सोसायटी , शिरगाव विसापूर 19) मणेराजुरी विकास सोसायटी, मणेराजुरी 20) राजापूर विकास सोसायटी, राजापूर 21) मांजर्डे (नवी)विकास सोसायटी, मांजर्डे 22) जिव्हाळा विकास सोसायटी लि., वंजारवाडी.

सहाव्या टप्प्यातील सोसायटी निवडणुका

1) डोंगरसोनी विकास सोसायटी, डोंगरसोनी 2) श्री सावळसिद्ध विकास सोसायटी, सावळज 3) श्री हनुमान विकास सोसायटी, वाघापूर 4) धोंडीराम विकास सोसायटी, वज्रचौडे 5) सिध्देश्‍वर विकास सोसायटी, धामणी 6) सिध्देश्‍वर विकास सोसायटी, बोरगाव 7) पाडळी विकास सोसायटी, पाडळी 8) भीमा विठ्ठल विकास सोसायटी, डोंगरसोनी 9) जलदेवता विकास सोसायटी, बेंद्री 10) हातनोली विकास सोसायटी, हातनोली 11) हनुमान विकास सोसायटी, लोढे

पाहा व्हिडिओ : 10 वर्षांच्या आदिश्रीने बनवलेल्या अ‍ॅपवर आता मिळणार सगळ्या झाडांची माहिती

Back to top button