सांगली : भाजप केवळ 4 मतदान केंद्रांवर आघाडीवर | पुढारी

सांगली : भाजप केवळ 4 मतदान केंद्रांवर आघाडीवर

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या प्रभाग ‘16 अ’च्या पोटनिवडणुकीत विजयी काँग्रेसला 34 पैकी 30 मतदान केंद्रांवर मताधिक्क्य मिळाले आहे, तर पराभूत भाजपला केवळ 4 मतदान केंद्रावर मताधिक्क्य मिळाले आहे.

पोटनिवडणुकीसाठी 34 मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 191 इतके मतदान झाले. काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांना 7 हजार 429, भाजपचे उमेदवार अमोल गवळी यांना 3 हजार 434, अपक्ष सुरेश सावंत यांना 587, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 535 मते पडली. शिकलगार यांना 34 पैकी 30 मतदान केंद्रावर मताधिक्क्य मिळाले आहे. गवळी यांना केवळ 4 केंद्रांवर मताधिक्क्य मिळाले आहे.

या 4 केंद्रांवर भाजपला मताधिक्क्य

मतदान केंद्र क्रमांक सात, पंधरा, तेहतीस आणि चौतीस या चार मतदान केंद्रांवर भाजपचे उमेदवार गवळी यांना मताधिक्क्य मिळाले. मतदान केंद्र क्रमांक सातवर (पटवर्धन हायस्कूल उत्तरेकडून पूर्वाभिमुखी खोली क्रमांक 8) गवळी यांना 152, शिकलगार यांना 104, मतदान केंद्र क्रमांक पंधरावर (आठवले विद्यामंदिर उत्तरेकडून पश्चिमेकडून उत्तराभिमुखी खोली क्रमांक 2) गवळी यांना 138, शिकलगार यांना 91, मतदान केंद्र क्रमांक तेहतीसवर (मनपा शाळा क्रमांक 15 उत्तरेकडून पूर्वाभिमुखी खोली क्रमांक 1) गवळी यांना 177, शिकलगार यांना 168, मतदान केंद्र क्रमांक चौतीसवर (आझाद व्यायाम मंडळ उत्तरेकडून पश्चिमाभिमुखी हॉल 1) गवळी यांना 174, शिकलगार यांना 139 मते मिळाली.

या केंद्रांवर काँग्रेसला मताधिक्क्य

मतदान केंद्रनिहाय शिकलगार व गवळी यांना मिळालेली मते : मतदान क्रेंद्र क्रमांक 1- 239 व 82, 2- 244 व 89, 3- 314 व 46, 4- 173 व 114, 5- 311 व 96, 6- 363 व 103, 8- 226 व 100, 9- 232 व 105, 10- 198 व 111, 11- 194 व 151, 12- 382 व 23, 13- 316 व 69, 14- 208 व 83, 16- 107 व 54, 17- 182 व 72, 18- 158 व 110, 19- 214 व 120, 20- 188 व 101, 21- 243 व 91, 22- 176 व 99, 23- 237 व 82, 24- 249 व 96, 25- 209 व 120, 26- 246 व 86, 27- 221 व 70, 28- 206 व 129, 29- 253 व 96, 30- 215 व 83, 31- 242 व 77, 32- 181 व 135.

Back to top button