कडेगावमध्‍ये भाजपचा विजय, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना धक्का

BJP

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा
कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. १७ पैकी ११ जागा जिंकत भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा दारुण पराभव केला. काँग्रेसला केवळ ५ जागावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या या पराभवाने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसला आहे.

नगरपंचायतीत सत्तांतर
कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीनेही 1 जागा जिंकत शहरात आपली एन्ट्री केली आहे.  नगरपंचायतीत सत्तांतर झाल्याने कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना हा धक्का मानला जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना हा निकाल बळ देणारा ठरला आहे. येथे तीन ठिकाणी शिवसेनेने तर दोन ठिकाणी अपक्षांनी निवडणूक लढवली परंतु त्याना यश मिळाले नाही. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

प्रभागनिहाय उमेदवार, मिळलेली मते, कंसात पक्ष 

प्रभाग क्रमांक : 1 
छाया दादासाहेब माळी : 277 (काँग्रेस) विजयी
उज्ज्वला सदाशिव माळी : 266 (भाजप )
शांता विनोद घाडगे : 66 ( राष्ट्रवादी)
नोटा : 3

प्रभाग क्रमांक : 2 
सागर सकट : 250 (काँग्रेस) विजयी
किशोर मिसाळ :228 (भाजप )
गोविंद घाडगे : 99 (राष्ट्रवादी)
राहुल चन्ने : 38 (शिवसेना)
नोटा : 5

प्रभाग क्रमांक : 3 
निलेश जगन्नाथ लंगडे : 287 (भाजप) विजयी
अतुल उर्फ सिद्धार्थ बबन नांगरे : 78 (राष्ट्रवादी)
महेश रामचंद्र पतंगे : 258 (काँग्रेस)
नोटा : 5

प्रभाग क्रमांक : 4 
नाजनीन पटेल : 260 (भाजप) विजयी
सविता जरग : 110 (राष्ट्रवादी)
अमीना पटेल : 180 (काँग्रेस)
नोटा : 4

प्रभाग क्रमांक : 5 
विजय शिंदे : 273 (काँग्रेस) विजयी
अक्षय देसाई : 34 (राष्ट्रवादी)
विश्वास व्यास :156 (भाजप)
नोट : 4

प्रभाग क्रमांक : 6 
धनंजय देशमुख : 339 (भाजप) विजयी
दत्तात्रय देशमुख : 20 (राष्ट्रवादी)
नामदेव रास्कर : 196 (काँग्रेस)
अनिल देसाई : 1 (शिवसेना)
नोटा : 2

प्रभाग क्रमांक : 7 
शुभदा देशमुख : 235 (भाजप), विजयी
शुभांगी देशमुख : 183 (काँग्रेस)
छाया मोहिते : 8 (शिवसेना)
नोटा: 9

प्रभाग क्रमांक : 8 
अमोल डांगे : 291 (भाजप),विजयी
पुरुषोत्तम भोसले : 268 (काँग्रेस)
प्रमोद जाधव : 5 (राष्ट्रवादी)
नितल शहा : 5 (अपक्ष)
नोटा : 4

प्रभाग क्रमांक : 9 
विजय गायकवाड : 261 (भाजप) विजयी
प्रशांत जाधव :159 (काँग्रेस)
किरण कुराडे : 75 (राष्ट्रवादी)
नोटा : 3

प्रभाग क्रमांक : 10 
सीमा जाधव : 269 (कॉग्रेस),विजयी
मंदाकिनी राजपूत : 175 (भाजप)
निशा जाधव : 72 (राष्ट्रवादी)
नोटा : 4

प्रभाग क्रमांक : 11
नजमाबी पठाण: 236 (भाजप) विजयी
दीपाली देशमुख : 216 (काँग्रेस)
अश्विनी देशमुख : 64 (राष्ट्रवादी)
नोटा : 12

प्रभाग क्रमांक : 12 
संदीप रामचंद्र काटकर : 184 (राष्ट्रवादी),विजयी
संजीवनी रामचंद्र जरग : 165 (भाजप)
संग्राम बाळासाहेब देसाई : 139 (काँग्रेस)
नोटा : 2

प्रभाग क्रमांक : 13 
दीपा चव्हाण : 170 (भाजप) विजयी
वनिता पवार : 165 (काँग्रेस)
अनुजा लाटोरे : 56 (राष्ट्रवादी)
नोटा : 3

प्रभाग क्रमांक : 14 
विद्या खाडे : 156 (भाजप) विजयी
ऋतुजा अधाटे : 154 (काँग्रेस)
नोटा : 1

प्रभाग क्रमांक :15 
मनोजकुमार मिसाळ : 240 (काँग्रेस) विजयी
प्रवीण करडे : 112 (अपक्ष)
बेबी रोकडे : 11 (भाजप)
हरी हेगडे : 7 (राष्ट्रवादी)
नोटा : 1

प्रभाग क्रमांक : 16 
रंजना लोखंडे : 249 (भाजप) विजयी
वनिता घाडगे : 135 (काँग्रेस)
प्राची पाटील : 25 (राष्ट्रवादी)
नोटा : 4

प्रभाग क्रमांक : 17 
मनीषा युवराज रजपूत : 331 (भाजप) विजयी
सुनंदा राजाराम शिंदे : 328 (काँग्रेस)
शीतल रुकेश चौगुले : 27 (राष्ट्रवादी)
नोटा : 10

Exit mobile version