Nagarpanchayat Election : नगरपंचायतींसाठी ८३.०४ टक्के मतदान | पुढारी

Nagarpanchayat Election : नगरपंचायतींसाठी ८३.०४ टक्के मतदान

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींच्या उर्वरीत 12 जागांसाठी चुरशीने 83.04 टक्के इतके मतदान ( Nagarpanchayat Election ) झाले. तर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 च्या पोट निवडणुकीसाठी 49.98 टक्के मतदान झाले. निवडणुकीपूर्वी कवठेमहांकाळमध्ये राजकीय वातावरण तापल्याने या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींची ( Nagarpanchayat Election ) मुदत संपल्याने येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु नामाप्र (ओबीसी) चे आरक्षण रद्द झाल्याने प्रत्येकी 4 अशा 12 जागांची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली होती. ती मंगळवारी पार पडली.  सर्व 51 जागांचा निकाल बुधवारी जाहीर केला जाणार आहे.

कडेगावमध्ये प्रभाग क्रमांक 1, 3, 12 व 17 या चार जागांसाठी आज मतदान ( Nagarpanchayat Election )झाले. या ठिकाणी 12 जण रिंगणात आहेत.  एकूण 2 हजार 978 मतदारांपैकी 2 हजार 426 मतदारांनी आपल्या मतदाराचा हक्क बजावला. येथे 81.46 टक्के मतदान झाले.

खानापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9, 11, 13 आणि 16 साठी मतदान पार पडले. यासाठी 11 जण रिंगणात आहेत. एकूण 1 हजार 278 मतदारांपैकी 1 हजार 105 जणांनी मतदान केले. या ठिकाणी 86.46 टक्के मतदान झाले.

कवठेमहांकाळ नगरपंचातीसाठी प्रभाग क्रमांक 5, 8, 16 आणि 17 या चार जागांसाठी 18 जण रिंगणात आहेत. या ठिकाणी 3 हजार 772 मतदारांपैकी 3 हजार 33 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथे 80.41 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायतींसाठी चुरशीने आणि महापालिकेच्या एका प्रभागारासाठी उत्साहात मतदान पार पडले.

 

Back to top button