सांगलीत साखर व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड

सांगली

सांगली, पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका साखर व्यापाऱ्यावर शनिवारी आयकर विभागाने धाड टाकली. यामध्ये महत्वाच्या कागदपत्रांसह मोठी रक्कम ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. सांगलीसह पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटकातील पथकांनी ही कारवाई केली.

व्यापाऱ्याच्या निवासस्थानासह मार्केट यार्ड परिसरातील दुकानांवरही आयकर विभागाने छापे टाकले. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. छाप्याबाबत आयकर विभागाकडून गुप्तता पाळण्यात आली होती. छापा टाकण्यात आलेला व्यापारी सह्याद्रीनगर परिसरात राहत असून, मार्केट यार्ड परिसरात त्यांचा मोठा साखर व्यवसाय आहे.

शनिवारी सकाळी आयकर विभागाची पथके सांगली शहरात दाखल झाली. सकाळपासूनच त्यांनी कारवाईला सुरूवात केली. आलीशान गाडी, मोठी रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे असल्याचे समोर आले. त्यानुसार दुपारी मार्केट यार्ड परिसरात त्या व्यक्तीच्या दुकानावर छापे टाकण्यात आले. या व्यापाऱ्यासह अन्य काही ठिकाणाही छापे टाकण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, याबाबत आयकर विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. मात्र आयकर विभागाच्या या छाप्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

Exit mobile version