सांगली मधील निर्बंध हटविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळला | पुढारी

सांगली मधील निर्बंध हटविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळला

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील कडक निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळला आहे. एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळे नियम लागू होत नाहीत.

तसेच कोरोना संसर्ग जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागूच राहतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे.

अधिक वाचा : 

कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने जिल्ह्यातील 174 गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. परंतु ती गावे वगळून इतर गावातील निर्बंध शिथिल करता येईल का? याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आला होता.

परंतु सांगली दौर्‍यावर आलेले केंंद्र आणि राज्याचे आरोग्य पथकाच्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पाहता मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला असून सध्या लागू असलेले निर्बंध जैसे थे  ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहणार आहेत.

हेही वाचले का?

पाहा फोटो :

Back to top button