fraud : घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोघांना अटक | पुढारी

fraud : घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोघांना अटक

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज येथील संजयनगरfraud fraud ) झाली आहे. या प्रकरणी महानगरपालिका कर अधीक्षक बाळासाहेब भूपाल मल्लेवाडी आणि गणेश बळवंत कांबळे या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. याप्रकरणी इम्तियाज मेहबूब जमखानेवाले व त्यांची पत्नी यांनी दीड वर्षांपूर्वी फिर्याद दिली होती, त्या नुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की स्वतःचे घर नसलेल्या तसेच भाड्याने राहणाऱ्या नागरिकांसाठी शासनाची एकत्मिक गृहनिर्माण सदनिका मिळणार आहे. अशी घरे कमी दरामध्ये संजयनगर येथे देण्यात येणार असल्याची माहिती मल्लेवाडी आणि कांबळे या दोघांनी जमखानेवाले यांना सांगितले होते. त्यानुसार जमखानेवाले यांनी म्हाडा कॉलनी येथे दोन घरे बुकिंग केले होते. प्रत्येकी घराचे तीस हजार रुपये आणि लाईट कनेक्शन फी असे एकूण 62 हजार रुपये दोघांनी जमखानेवाले यांच्याकडून घेतले होते. यानंतर पैसे घेतल्याची पावती आणि महापालिकेचे सही शिक्का असलेली कागदपत्रे देखील दोघांनी जमखानेवाले यांना दिली होती. तसेच एस 13 आणि एस 14 असे घरांचे नंबर ही जमखानेवाले यांना दिले होते. परंतु, घराचा ताबा घेण्यास गेल्यानंतर जमखानेवले यांना घराचा ताबा मिळाला नाही, त्यामुळे जमखानेवले यांनी मल्लेवाडी यांच्याकडे घरासाठी घेतलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी केली होती. ( fraud )

मल्लेवाडे याने काही दिवसात रक्कम देतो असे सांगितले. परंतु, या प्रकरणातील संशयित कांबळे हा गेली दीड वर्ष फरार झाला होता. यानंतर जमखानेवाले यांनी दीड वर्षापूर्वी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी जवळपास पस्तीस ते चाळीस लोकांची फसवणूक झाली असल्याचे समजते. तसेच या मध्ये महापालिकेचे अनेक मोठे अधिकारी गुंतले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन महात्मा गांधी चौक पोलिसांनी केले आहे.

 

Back to top button