मुरुड तालुक्यात नारळाच्या झाडांच्या कोंबात आळ्या पडून कोंब कुजण्याचा प्रकार बागायतींतून दृष्टीस पडत आहेत. काही नारळांच्या झाडांवर करपा रोग तर काही झाडांवर इलिओफाईड कोळी, काळ्या डोक्याची आळी, गेंड्या भुंगा, तसेच काही झाडांच्या पानांवर पांढर्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पांढरी बुरशी देखील पकडलेली दिसते. यामुळे नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. रोगांमुळे तालुक्यातील नारळ उत्पादन घटल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
भातपिकाच्या खालोखाल मुरुड तालुक्यातील शेकडो बागायतदार शेतकरी नारळ -सुपारी पिकाचे उत्पन्न घेतात. मुरुड तालुक्यातील 74 गावे व 24 ग्रामपंचायतींचे एकूण भौगोलिक क्षेत्र 26 हजार 525 हेक्टर असून त्यातील सुपारी 416 तर नारळाचे पीक 435 हेक्टरवर घेतले जाते. निसर्ग वादळात त्यापैकी 77.47 हेक्टर नारळ पिकाखालील क्षेत्र बाधीत झाले होते. हा मोठा फटका नारळ उत्पादक बागायतदार शेतकर्यांना बसला होता. या घटनेला चार वर्षांचा काळ लोटला असला तरी बागायतदार अजून त्या आर्थिक धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. नारळाचे उत्पादन घटल्याने मुरूड परिसरात एक नारळाची किंमत 40 ते 45 वर पोहोचली आहे.
या वादळापूर्वी मुरुड तालुक्यातील शहाळ्यांचा व्यापार करणारे व्यापारी दररोज चार ते पाच ट्रक शहाळी नवी मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवित असत. आज हे प्रमाण एक ते दोन टेंपो इतके घसरले आहे. निसर्ग वादळापासून एकूणच नारळ उत्पादनात घट झाली आहे ती आजही कायमच आहे. त्यात नारळाच्या झाडांवर व फळांवर पडत असलेल्या विविध रोगांमुळे हे पीक संकटात सापडले आहे.
सध्याच्या घडीला येथील बागायतीतील नारळाच्या झाडांवर पांढर्या अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. पांढर्या रंगाच्या सुरवंटाच्या जातीच्या या अळ्या झापांची पाने गुंडाळून पानांचा फडशा पाडताना दिसत आहेत. तर पांढर्या माशीच्या प्रादुर्भावामुळे उभे नारळाचे झाड सुकून जाऊन बागायतदारांचे मोठे नुकसान करीत आहे. या खेरीज नारळाच्या झाडांच्या शेंड्यात घुसून पोखरणार्या भुंग्यांमुळे येथील बागायतदार अक्षरशः त्रस्त झाले आहेत. ऐन उत्पन्न देणार्या माडाचा शेंडा कुरतडून खाऊन फस्त करणारे भुंगे उभे झाड मारून टाकत आहेत.
काही झाडांच्या कोंबात आळ्या पडून कोंब कुजण्याचा प्रकारही काही बागायतींतून दृष्टीस पडत आहे. काही नारळाच्या झाडांवर करपा रोग तर काही झाडांवर इलिओफाईड कोळी, काळ्या डोक्याची आळी, गेंड्या भुंगा, तसेच काही झाडांच्या पानांवर पांढर्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पांढरी बुरशी देखील पकडलेली दिसते. या पांढर्या बुरशीमुळे पानांतून अन्नरस तयार होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी काही दिवसातच झाड मरुन जाते. अशा या विविध रोगांना निसर्ग वादळातून बचावलेली झाडे आता बळी पडत आहेत.
या विविध रोगांवर असलेल्या औषधांची फवारणी ऐंशी ते शंभर फुटांपर्यंत उंच वाढलेल्या नारळाच्या झाडांवर करणे शक्य होत नाही. हातपंपाने विस ते पंचवीस फुटांपर्यंतच फवारणी करणे शक्य होते. अशा या विविध रोगांना वेळीच आवर घालण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
चक्रीवादळापूर्वी मुरुड तालुक्यातील शहाळ्यांचा व्यापार करणारे व्यापारी दररोज चार ते पाच ट्रक शहाळी नवी मुंबईतील वाशी बाजारात विक्रीसाठी पाठवित असत. आज हे प्रमाण एक ते दोन टेंपो इतके घसरले आहे. निसर्ग वादळापासून एकूणच नारळ उत्पादनात घट झाली आहे ती आजही कायमच आहे. त्यात नारळाच्या झाडांवर व फळांवर पडत असलेल्या विविध रोगांमुळे हे पीक संकटात सापडले आहे.